Vodafone Idea (Vi) ने अखेर भारतात 5G सेवा सुरू केली असून पहिल्यांदा ही सेवा मुंबईत उपलब्ध झाली आहे. लवकरच बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये देखील Vi 5G नेटवर्क लाँच केले जाईल. Vi ने आपल्या 5G सेवांसाठी नवीन मायक्रोसाइट लाँच केली असून यावर ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटी आणि नवीन प्रीपेड व पोस्टपेड प्लॅनची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
Vi ने आपल्या 5G सेवेबाबत ‘लायटनिंग-फास्ट कनेक्टिव्हिटी विद Vi 5G’ आणि ‘संवादाच्या नवीन युगात आपले स्वागत आहे’ असे मेसेज आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केले आहेत. ग्राहकांना त्यांच्या राज्यात 5G सेवा उपलब्ध आहे का हे तपासण्यासाठी वेबसाइटवर एक विशेष पर्याय देण्यात आला आहे. सध्या ही सेवा फक्त मुंबईत उपलब्ध असून एप्रिल 2025 पर्यंत इतर प्रमुख राज्यांत ती सुरू होणार आहे.
Vi चे स्वस्त 5G प्रीपेड प्लॅन :
Vi ने आपल्या ग्राहकांसाठी परवडणारे 5G प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. हे प्लॅन सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.
₹299 प्लॅन – 28 दिवसांची वैधता, दररोज 1GB डेटा
₹349 प्लॅन – 28 दिवसांची वैधता, दररोज 1.5GB डेटा
₹365 प्लॅन – 28 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा
₹3,599 प्लॅन – 365 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा
या सर्व प्लान्समध्ये अनलिमिटेड 5G डेटा देण्यात येणार आहे, जे Vi ग्राहकांसाठी एक मोठी संधी आहे.
Vi ने ज्या किंमतीत 5G सेवा आणली आहे, त्यामुळं Jio आणि Airtelला मोठे टेन्शन निर्माण होऊ शकते. Vi च्या 5G नेटवर्कचा विस्तार आणि स्वस्त प्लॅनमुळे भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.