OnePlus लवकरच आपली Ace 5 सीरिजमध्ये नवीन धमाकेदार एडीशन – OnePlus Ace 5 Supreme Edition सादर करणार आहे. या फोनबाबतची माहिती लॉन्चपूर्वीच लीक झाली असून, 16GB RAM आणि MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसरसह येणारा हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे.
– 16GB रॅमसह उत्कृष्ट प्रोसेसिंग पॉवर
– MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसर
– Fengchi गेमिंग कोर तंत्रज्ञानासह खास गेमिंगसाठी डिझाईन
OnePlus | भारतात येणार का? :
हा स्मार्टफोन फक्त चीनमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती असून, भारतासह जागतिक बाजारात याची उपलब्धता फारशी शक्य नसल्याचं बोललं जातं. मात्र याच सीरिजमधील Ace 5 Racing Edition नावाचा आणखी एक डिव्हाइस जागतिक बाजारात OnePlus Nord 5 या नावाने सादर होण्याची शक्यता आहे.
OnePlus Ace 5 Racing Edition फीचर्स:
– MediaTek Dimensity 9400e चिपसेट
– 6.77-इंच LTPS डिस्प्ले
– 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा
– शक्तिशाली गेमिंग अनुभवासाठी Fengchi गेमिंग कोर
OnePlus च्या एका अधिकाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे या फोनचा रिटेल बॉक्स आणि काही स्पेसिफिकेशन्स आधीच उघड झाले आहेत. त्यामुळे लॉन्चपूर्वीच या स्मार्टफोनने बाजारात उत्सुकता निर्माण केली आहे.