Mukesh Ambani l रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा एक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे Google सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या चिंतेत भर पडली आहे. कारण, जिओकडून त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे, जी थेट Google Drive ला टक्कर देत आहे.
गुगल जेथे युजर्सना फक्त १५ जीबी मोफत क्लाउड स्टोरेज देतं, तिथे रिलायन्स जिओने त्यांच्या वापरकर्त्यांना ३०० रुपयांच्या आत मोफत ५० जीबी स्टोरेज देण्याची घोषणा केली आहे. यामुळे कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गुगलच्या क्लाउड सर्व्हिसमध्ये वापरकर्ता Gmail, Drive आणि Photos यासाठी एकत्रित 15 जीबी स्टोरेज मिळतो. ही मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना गुगलचे पेड सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावे लागतात – ज्यासाठी महिन्याला 59 ते 210 रुपयांपर्यंत खर्च येतो.
पण जिओने आता प्रीपेड यूजर्ससाठी ₹299 च्या प्लॅनमध्ये ५० जीबी मोफत क्लाउड स्टोरेज देण्याची ऑफर सुरू केली आहे. तसेच, पोस्टपेड युजर्सनाही हे स्टोरेज मोफत दिले जात आहे. यामुळे जिओ युजर्ससाठी स्वतंत्र, भरपूर आणि खर्चिक स्टोरेजचा प्रश्न सुटला आहे.
Mukesh Ambani l 5G स्पीडमध्येही जिओ आघाडीवर :
फक्त क्लाउड स्टोरेजच नव्हे तर 5G नेटवर्क स्पीडमध्येही जिओ आघाडीवर आहे. देशातील 5G डाउनलोडिंग स्पीड पाहिल्यास:
Jio: 158.63 Mbps
Airtel: 100.67 Mbps
VI: 21.60 Mbps
BSNL: 7.18 Mbps
या स्पीडनुसार जिओने पुन्हा एकदा डिजिटल इंडिया अभियानात आपली आघाडी सिद्ध केली आहे.
गुगल युजर्सचे पैसे, जिओ युजर्सचा फायदा! :
गुगलचे क्लाउड प्लॅन:
Lite Plan: 30 GB – ₹59/महिना
Basic Plan: 100 GB – ₹130/महिना
Standard Plan: 200 GB – ₹210/महिना
यामधून स्पष्ट होते की, जिओचे फ्री 50 GB क्लाउड स्टोरेज हे गुगलच्या Lite प्लॅनपेक्षा जास्त आहे, तेही कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना.