Mobile Recharge Price Hike l राज्यातील आणि देशातील मोबाईल वापरणाऱ्यांना लवकरच मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या 2025 च्या अखेरीस प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या खर्चामुळे आणि 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी आवश्यक गुंतवणूक लक्षात घेता कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. (Mobile Recharge Price Hike)
भारती एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Jio) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या प्रमुख टेलिकॉम कंपन्या सध्या टॅरिफ रिव्हिजनच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे 2024 च्या शेवटापर्यंत एअरटेलचा एका ग्राहकामागील सरासरी उत्पन्न (ARPU) 245 रुपये, जिओचा 203 रुपये आणि व्होडाफोन आयडियाचा 166 रुपये होता. येत्या काळात हे उत्पन्न 300 रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.
सध्या टेलिकॉम कंपन्या नेटवर्क विस्तार, स्पेक्ट्रम खरेदी आणि नियामक शुल्क यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. व्होडाफोन आयडियाने नुकतीच 36,450 कोटी रुपयांची स्पेक्ट्रम थकबाकी सरकारला भरण्यासाठी हिस्सेदारांना शेअर्स रूपाने दिले आहेत. त्यामुळे त्यांचा बाजारातील हिस्सा 22.6% वरून 29% पर्यंत वाढला आहे. (Mobile Recharge Price Hike)
टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘रेट रिपेअर’ ही प्रक्रिया असून, टेलिकॉम कंपन्यांच्या उत्पन्नात सातत्य टिकवण्यासाठी टॅरिफ वाढ गरजेची ठरत आहे. पुढील काही वर्षांमध्ये टॅरिफमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Mobile Recharge Price Hike l कधीपासून वाढणार दर? :
व्होडाफोन आयडियाचे सीईओ अक्षय मूंद्रा यांनी स्पष्ट केले की, भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत दर 9 महिन्यांनी टॅरिफ वाढ होणं आवश्यक आहे. त्यामुळेच मोबाईल ग्राहकांनी दरवाढीच्या तयारीत राहणं आवश्यक आहे.
मात्र कंपन्यांचं म्हणणं आहे की, उत्तम सेवा, उत्कृष्ट नेटवर्क आणि 5G विस्तारासाठी ही वाढ अपरिहार्य आहे. (Mobile Recharge Price Hike)