Jio OTT Plan l ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी रिलायन्स जिओने एक जबरदस्त ‘फुल पैसा वसूल’ प्लॅन सादर केला आहे. फक्त 175 रुपयांमध्ये 10 प्रसिद्ध OTT ॲप्सचा मोफत ऍक्सेस आणि 10 GB हाय-स्पीड डेटा देणारा हा प्लॅन प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
10 GB हाय-स्पीड डेटा
10 प्रीमियम OTT प्लॅटफॉर्म्सचा मोफत सबस्क्रिप्शन
28 दिवसांची वैधता
यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत घटतो. हा प्लॅन मुख्यत्वे डेटा व ओटीटी मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेला आहे.
Jio OTT Plan l कोणते OTT ॲप्स मिळणार मोफत? :
ZEE5
Sony Liv
Discovery+
Planet Marathi
Lionsgate Play
Chaupal
Hoichoi
Kancha Lanka
Jio TV
Sun NXT
या सर्व अॅप्सवर तुम्ही वेब सीरिज, चित्रपट, डॉक्युमेंट्री आणि लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता – तेही एका सिंगल रिचार्जमध्ये!
कॉलिंग हवी असेल तर? :
175 रुपयांचा प्लॅन डेटा आणि ओटीटी केंद्रित प्लॅन असल्यामुळे यामध्ये मोफत कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा नाही. जर तुम्हाला कॉलिंगसह सर्व सुविधा हव्या असतील तर जिओचा 445 रुपयांचा प्लॅन एक उत्तम पर्याय आहे.
445 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय? :
दररोज 2 GB डेटा
अनलिमिटेड कॉलिंग
दररोज 100 SMS
10 OTT अॅप्सचा मोफत ऍक्सेस
50 GB एआय क्लाउड स्टोरेज
यामुळे जर तुम्ही संपूर्ण एंटरटेनमेंट आणि कम्युनिकेशनसाठी एकाच प्लॅनचा विचार करत असाल, तर 445 रुपयांचा प्लॅन अधिक फायदेशीर ठरतो.